- २० मे पर्यंत कोरोना चाचणी करून घेणे गरजेचे ; अन्यथा व्यवसाय करता येणार नाही
- नियमांची कडक अंमलबजावणी सध्या हाच मुख्य तोडगा....
राजुरा -
कोरोनाच्या पादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने व्यापारी, दुकानदार, फेरीवाले, भाजी विक्रेत्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. पहिल्या टप्यात फेरीवाले, भाजीपाला, फळ, दूध, चिकन - मटण इत्यादी विक्रेते, दुसऱ्या टप्प्यात मेडिकल, किराणा दुकानदार व त्यांचे अधिनस्थ सहकारी कर्मचाऱ्यांना RTPCR चाचणी करून कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. २० मे पर्यंत कोरोना चाचणी करून घेणे गरजेचे असून त्यानंतर जेव्हापर्यंत RTPCR चाचणी करून कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सोबत राहणार नाही तोपर्यंत व्यावसायिकांनी व्यवसाय करण्याचे टाळावे असेही आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. RTPCR टेस्ट नसलेल्या व्यापाऱ्यांच्या आस्थापना बंद करण्यात येईल असेही प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
"नागरिकांचे आरोग्य त्यांच्याच हाती"
शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी घ्यावी लागेल, सर्व व्यापाऱ्यांनी चाचणी करून घ्यावी, हे आपल्या, कुटुंबियांच्या व आपल्या ग्राहकांच्या हिताचे ठरेल तरी वर नमूद केलेल्या सर्व व्यावसायिकांनी चाचणी करून घ्यावी व सुरक्षित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.