Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रासायनिक खते व पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निदर्शन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - केंद्र सरकारने वाढविलेल्या रासायनिक खते पेट्रोल डीझल दरवाढीचा चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस...

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
केंद्र सरकारने वाढविलेल्या रासायनिक खते पेट्रोल डीझल दरवाढीचा चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून निषेध करण्यात आला. 

एकीकडे देशात कोरोना महामारीमुळे जनता त्रस्त होत असतांना गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डीझल चे दरवाढ करून जनतेला त्रस्त केल्या जात असताना आता रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये 40% वाढ करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे कार्य केंद्र सरकार करीत आहे. ह्याचा निषेध म्हणून चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज 17 मे ला प्रियदर्शनी चौक व जिल्हाधीकारी कार्यालयासमोर कोरोना नियमांचे पालन करीत केंद्र सरकार चा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, जिल्ह्यातील जेष्ठ नेते हिराचंद बोरकुटे, जेष्ठ नेते महादेव पिदूरकर, माजी नगराध्यक्ष दीपक जयसवाल, जेष्ठ नेते डी.के. आरीकर, सुनील दहेगांवकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, प्रदेश प्रतिनिधी सुरेश रामगुंडे, महिला अध्यक्ष ज्योती रंगारी, युवक अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी, किसान जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल एजाज, शहर महासचिव संभाजी खेवले, अल्पसंख्याक अध्यक्ष नौशाद सिद्दिकी, जेष्ठ नेता विनोद लभाने, शहर उपाध्यक्ष निसार शेख, नयन साखरे, अभिनव देशपांडे, सतीश मांडवकर, राहुल देवतळे, केतन जोरगेवार, शुभम प्रजापती, शुभम मुखर्जी, विकास अडबाले, रवी वाळके, पवन गेडाम, सुमेद मेश्राम, सुभाष प्रजापती, अखिलेश राऊत इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top