Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरोनामूळे अनाथ झालेल्यांच्या मुलां, मुलींना देणार मोफत शिक्षण : माजी मंत्री संजय देशमुख
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - भारतदेश समवेत जगात कोरोना महामारीने थैमान घातले. या महामारीत अनेक कुटुंब उध्वस्त झाली ; घरातील ...

रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
भारतदेश समवेत जगात कोरोना महामारीने थैमान घातले. या महामारीत अनेक कुटुंब उध्वस्त झाली ; घरातील अनेक कर्ते माहिला, पुरुषांचा मृत्यू झाला ; असंख्य बालकांची छत्रे हरवली. दिग्रस, दारव्हा, नेर येथील अशा छत्रछाया हरविलेल्या मुलांच्या शिक्षणाची मोफत सोय करणार अशी घोषणा माजी मंत्री संजयभाऊ देशमुखांनी केली. 

कोरोना आजारावरील उपचारखर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे ;आणि अशातच ज्यांची पोटं हातावर आहेत त्यांना सरकारी दवाखान्याशिवाय पर्याय राहत नाही. पण तेथेही शासन व प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार पहावयास मिळतो, कधी ऑक्सीजनची आणिबाणी , कधी बेडची कमतरता, औषधांची काळाबाजारी तर कधी औषधांची कमतरता पहावयास मिळाली. नैसर्गिक आपत्तीबरोबर माणवनिर्मित आपत्तीमूळेही अनेक जीव प्राणास मूकले. अनेक मुलं अनाथ झाली, वृद्ध मातापित्यांची कर्ते मुलं गेली,प्रशासनाचे उदासिन धोरण अशा हालाखीच्या परिस्थितीत त्या कुटुंबाकडे कोण पाहणार?त्या मुला, मुलींच्या भाविष्याचे, शिक्षणाचे काय? असे अनेक निशब्द करणारे प्रश्न निर्माण झाले आहेत. पण असे असूनही समाज जागृत आहे, जीवंत आहे हे माजी मंत्री संजयभाऊ देशमुख यांच्या माध्यमातून पून्हा एकदा प्रत्ययास आले. शिक्षणाप्रती, समाजकार्याप्रती श्रद्धा असणारे संजयभाऊंनी आपल्या दिग्रस तालुक्याबरोबरच दारव्हा, नेर तालुक्यातील गरिब कुटुंबातील जर कोणीही कोरोनामूळे ज्यांची आई, वडिल मरण पावली असतील अशांनी 8329630684 किंवा 9922265777 मो. क्रमांकावर संपर्क करुन अशा मुलांची शिक्षणाची सोय ' ईश्वर देशमुख इंग्लीश मेडिअम स्कुल, दिग्रस येथे करण्यात येईल. अशी घोषणा  संजयभाऊ मित्रमंडळ, ईश्वर फाऊंडेशन, परिवर्तन विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने केली आहे.

'ईश्वर फाऊंडेशन' संस्थेच्या  संयोजिका सौ. वैशालीताई संजयराव देशमुख यांनी मुला, मुलींना समाजात सन्मानाने जगता यावे, शिक्षणाची सोय उपलब्ध करून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी केलेली मोफत शिक्षणाची सोय त्या अनाथ बालकांना नवसंजिवनी ठरणारी आहे. 





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top