Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: माहे, मे 2021 करिता नियंत्रित शिधाजिन्नसांचे मोफत वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सार्वजनिक वितरण व्यवस्था - बल्लारपूर तालुका शिधापत्रिका क्षेत्र मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - दि.12 मे : बल्लारपूर तालुका श...

  • सार्वजनिक वितरण व्यवस्था - बल्लारपूर तालुका शिधापत्रिका क्षेत्र
मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
दि.12 मे : बल्लारपूर तालुका शिधापत्रिका क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे, मे 2021 करिता कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियंत्रित शिधाजिन्नसांचे परिमाण व दर निश्चित करण्यात आले असून राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नियमित गहू व तांदूळ मोफत मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना गहू व तांदूळ मोफत मिळणार आहे.

असे राहतील वितरित करण्यात येणाऱ्या शिधाजिन्नसांचे वस्तूंचे दर व परिमाण:
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिका धारकांना गहू प्रति व्यक्ती 3 किलो तर तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो यानुसार मोफत देय राहील.

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत गहू  प्रति शिधापत्रिका 15 किलो व तांदूळ प्रति शिधापत्रिका 20 किलो यानुसार मोफत देय राहील, तर साखर 20 रुपये प्रति किलो दराने, प्रति शिधापत्रिका 1 किलो शिधापत्रिका धारकांना देय राहील.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिका धारकांना गहू व तांदूळ मोफत असून गहू प्रति व्यक्ती 3 किलो तर तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो परिमाणाने देय राहील.

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत गहू व तांदूळ मोफत असून गहू प्रति व्यक्ती 3 किलो तर तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो परिमाणाने देय राहील. असे बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top