Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शेतकरी आर्थिक संकटात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ब्रेक द चैन मुळे बॅंकेच्या कामकाजावर मर्यादा पीक कर्ज वाटप ठप्प रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ (नेर) - ब्रेक द चैन मुळे बँकेत कर...

  • ब्रेक द चैन मुळे बॅंकेच्या कामकाजावर मर्यादा
  • पीक कर्ज वाटप ठप्प
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ (नेर) -
ब्रेक द चैन मुळे बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने गेल्या महिनाभरापासून पीक कर्ज वाटप प्रक्रिया ठप्प आहे. करोनामुळे इतर कामकाज ही संथ गतीने सुरू आहे. परिणामी, ग्राहकांना हेलपाटे मारावे लागत आहे.

शेतीचा पतपुरवठा झाला नाही तर शेतकऱ्यांपुढे अत्यंत गंभीर अस आर्थिक संकट निर्माण होऊ शकते. अवघ्या काही दिवसांवर पेरणी आली आहे. पेरणी कशी करायची? पेरणी साठी लागणार खत, बियाणे कसे विकत घ्यायचे? पैसे आणायचे तरी कुठुन? हा प्रश्न शेतऱ्यांसमोर उभा झाला आहे ? खरतर देशावर कोरोना च संकट आहेच परंतु शेतकर्यांचा प्रश्न मागे ठेऊन चालणार नाही. कारण पिकच उगवल नाही तर खाणार काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर पीक कर्ज वाटप सूरू करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून सरकार कडे केली जात आहे. पीक कर्जाच्या प्रतिक्षेत शेतकरी वर्ग असून लवकरात लवकर पाऊल उचलण्याची मागणी सुद्धा होत आहे.  


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top