- सच्चा साथी गमावला - अँड. वामनराव चटप
- प्रभाकर दिवे यांच्या निधनाने एक निष्ठावंत नेता हरवला - आमदार सुभाष धोटे
- जुना सहकारी व मित्र गमावला - अँड. संजय धोटे
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना / गडचांदूर -
शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, विदर्भ बळीराज्याचे उपाध्यक्ष, विदर्भ राज्य कोअर कमिटीचे सदस्य प्रभाकर दिवे यांचे आज दुपारी नागपूर येथील खाजगी रूग्णालयात निधन झाले ते 66 वर्षाचे होते. पंधरा दिवसांपूर्वी प्रभाकर दिवे यांचा गडचांदूर येथे कारला ट्रकने धडक दिल्याने अपघात झाला होता. त्यांना नागपूर येथे दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रभाकर दिवे हे चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे पंधरा वर्षे मानद सचिव आणि पाच वर्षे चंद्रपूर जिल्हा परिषदचे स्विकृत सदस्य होते. माजी आमदार अँड. वामनराव चटप यांचे ते खंदे समर्थक होते. यापुर्वी त्यांनी शेतकरी संघटनेकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती. गेली चाळीस वर्ष शेतकरी संघटनेच्या प्रत्येक आंदोलनात भाग घेऊन त्यांनी नेतृत्व केले. अनेकदा त्यांना कारावास भोगावा लागला होता. निर्भीड आणि आक्रमक नेतृत्व अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाबद्दल शेतकरी संघटना परिवाराने शोक व्यक्त केला आहे. त्यांचे मागे पत्नी, मुलगा व मोठा आप्तपरिवार आहे.
सच्चा साथी गमावला - अँड. वामनराव चटप
प्रभाकर दिवे यांच्या जाण्याने शेतकरी संघटना व विदर्भ राज्य चळवळीचे अपरिमित नुकसान झाले आहे. चाळीस वर्षे शेतकर्यांच्या घामाच्या दामासाठी लढणारा सच्चा साथी गमावला आहे.
जुना सहकारी व मित्र गमावला - अँड.संजय धोटे
प्रभाकर दिवे हे माझे जुने सहकारी होते. सहकार क्षेत्रातील जाणकार, शेतकरी संघटनेचा कडवा व आक्रमक कार्यकर्ता आणि आपला चांगला मित्र गमावला आहे.
प्रभाकर दिवे यांच्या निधनाने एक निष्ठावंत नेता हरवला - आमदार सुभाष धोटे
प्रभाकर दिवे यांच्या निधनाने एक निष्ठावंत आणि लढवय्या कार्यकर्ता, नेता आपल्यामधुन हरवला आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर, नातेवाईकांवर, त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो अशी भावनिक प्रतिक्रिया आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.