Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भूमी अभिलेख कार्यालय बंद असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रांची कामे रखडली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रशासन आपल्या दारी अभियानाचा ब्रेक द चैन मुळे उडाला फज्जा रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ (नेर) - प्रशासनाने जिल्ह्यातील शासकीय ...

  • प्रशासन आपल्या दारी अभियानाचा ब्रेक द चैन मुळे उडाला फज्जा

रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ (नेर) -
प्रशासनाने जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची कागदपत्रे मिळणे अशक्य झाले आहे  शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यासाठी जमीनीच्या नकाशाची गरज पडत आहे परंतु 31 मे पर्यंत भूमी अभिलेख कार्यालय बंद राहणार असे अधिकारी सांगित आहे. शेतकऱ्यांना शासकीय कार्यालये बंद असल्यामुळे कागदपत्रांअभावी पिक कर्जा पासून वंचित राहावे लागले. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या धोरणेमुळे प्रशासन आपल्या दारी अभियानाचा ब्रेक द चैन मुळे फज्जा उडत असल्याची ओरड आता नागरिक  करीत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर शासकीय कार्यालये उघडण्याचे आदेश द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनकडुन केली जात आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top