Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त; महावितरणाचा भोंगळ कारभार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रामपूर, सास्ती, गोवरी येथील वारंवार खंडीत होणार वीजपुरवठा सुरळीत करा संकल्प फाउंडेशन रामपूर तर्फे महावितरण ला निवेदन महावितरणचच्या झोलाझेंडी...

  • रामपूर, सास्ती, गोवरी येथील वारंवार खंडीत होणार वीजपुरवठा सुरळीत करा
  • संकल्प फाउंडेशन रामपूर तर्फे महावितरण ला निवेदन
  • महावितरणचच्या झोलाझेंडी कारभारामुळे शिवसेनेचे बबनभाऊ उरकुडे अक्शन मोडवर
  • युवा स्वाभिमान पार्टीचे सूरज ठाकरे यांची मुख्य कार्यकारी अभियंता यांचेशी फोनवर चर्चा
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -

तालुक्यातील रामपूर, सास्ती, गोवरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने सर्वसामान्य नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या विरोधात जनआंदोलन करण्याचा पवित्रा विद्युत ग्राहक नागरिकांनी घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की रामपूर, सास्ती, गोवरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे विद्युत पुरवठा कमी दाबाने होणे या समस्येचा सामना गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना करावा लागत आहे. कोरोना महामारीमुळे अनेक रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये असल्याने वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे मरणापेक्षा जगणे असह्य झाले आहे अशी भावना शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बबनभाऊ उरकुडे यांनी व्यक्त केली आहे. 

रामपूर, सास्ती, गोवरी हि गांवे मोठी असून गावातील लोकसंख्या ५ ते ६ हजाराच्या वर आहेत. सदर गावात वारंवार दिवस रात्र वीजपुरवठा खंडित होतो या भागात कोल माईन्स कर्मचारी, शिक्षक तसेच इतरही नागरीक असतात ते वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्या त्रस्त झाले आहेत. परंतु या कडे महावितरणचे अधिकारी व लोकप्रतिनिधी ही लक्ष देत नसल्यामुळे रामपूर येथील सामाजिक संस्था संकल्प फाउंडेशन ने पुढाकार घेऊन सर्व सदस्यांनी निर्णय घेऊन महावितरण कार्यालयात वीज सुरळीत करा चे निवेदन सादर केले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती उपाययोजना करू व वारंवार वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेणार अशी ग्वाही महावितरण अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी संकल्प फाउंडेशनचे सुरज गव्हाने, उज्वल शेंडे, ओमप्रकाश काळे, दिनेश वैरागडे, गितेश कौरासे, शुभम बोबडे, अक्षय डखरे, दिपक झाडे, गोलु दुपारे उपस्थित होते. 

राजूरातही विजेचा लपंडाव - सूरज ठाकरे यांची मुख्य कार्यकारी अभियंता यांचेशी फोनवर चर्चा
राजुरा शहरात २२० केव्ही चे सबस्टेशन करण्याबाबत तसेच वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या समस्यांबाबत युवा स्वाभिमान पार्टीचे सूरज ठाकरे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिवेदन पाठविले असून याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अभियंता देशपांडे साहेबांशी फोनवर चर्चाही केली. सूरज ठाकरे यांनी सांगितले कि मागील ४० वर्षापासुन विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा जशीच्या तशी आहे. शहरात वाढणारी लोकसंख्या तसेच तालुकास्तर असल्यामुळे आणि औद्योगिक वसाहतीमुळे वीज पुरवठा यंत्रणेवर अधिकचा भार पडत आहे. यावर ठाकरे यांनी मुख्य कार्यकारी अभियंता देशपांडे साहेबांशी फोनवर चर्चा केली. मुख्य कार्यकारी अभियंता देशपांडे यांनी सांगितले कि, वादळ असेल, एखाद्यावेळी मेन्टनन्स करिता वीज पुरवठा खंडित करण्यात आला असेल तर वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. सध्या डिमांड आणि सप्लायचा कोणताही अडथळा नाही आहे, वीज सरप्लस आहे, पण वातावरण बदलामुळे बरेचशे इन्शुलेटर फुटतात तर ते शोधणे जरा अवघड जाते. आणि दुरुस्तीला वेळही लागतो हे मुख्य कारण असू शकते. सध्या लाइनदुरुस्तीचे लाईनच्या जवळून जाणाऱ्या मोठ्या झाडाच्या फांद्या छाटण्याचे कामही सुरु आहे. मान्सूनपूर्वी अवकाळीपाऊस पडला तर इन्शुलेटर पंक्चर झाल्याने वीज पुरवठा खंडित होतो पण एकदा पाऊस सुरळीत झाला तर मग सर्व सुरळीत होते. तरी काही अडचणी येत असतील तर आम्ही राजुरा येथील अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. असे असले तरी सध्यातरी यावर अमलबजावणी होत आहे असे तरी दिसून येत नाही आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top