- रमजान ईद ला मुस्लिम समाजातील गरजुंना ब्लेँकेट वाटप
- रामचंद्र (रामा) घटे यांचा स्तूत्य उपक्रम
गेल्या अनेक वर्षापासुन घटे यांनी अविरतपणे हे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. यापूर्वी अगदी नागपूर,चंद्रपुर येथील अनाथालयासाठी पण त्यांनी अन्नदान केले आहे. हिंदू मान्यतेनुसार अक्षय तृतीया या मुहूर्तांला अनन्य साधारण असे महत्व आहे. या दिवशी अनेक चांगले कार्य केले जातात. त्यामुळे आपल्या परिवारातील स्वर्गवासी झालेल्या आप्तस्वकीयांच्या स्मर्णाथ घटे परिवाराकडून हे कार्य केले जाते. रामपूर येथील स्वामी विवेकानंद अनाथ बालग्रूह व चूनाळा येथील नारायणदास मावानी गोशाळा येथे ब्लेंकेट ,अन्नदान व ग्रामगीता पुस्तके वितरित करण्यात आले. वेकोली येथील कंत्राटी कामगारांनाही ब्लेंकेट व अन्नदान तर रमजान ईद नीमीत्य मुस्लिम समाजातील गरजूना ब्लेंकेट वितरित करण्यात आले. रामचंद्र घटे यांच्या पत्नी सुनंदा, मुलगा आकाश व मुलगी वैष्णवी यांची साथ त्यांना नेहमी मिळत असते. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग सचिव बादल बेले, स्वामी विवेकानंद अनाथ बालग्रूह चे मारोती गव्हाणे, चूनाळा येथील गोशाळेचे दिलीप म्हैसणे, संतोष नांदेकर आदिंची उपस्थिति होती.
कोविड नियमांचे काटेकोरपने पालन करण्यात आले. घटे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. कोविड काळात आपली सामाजिक बांधिलकी जोपासत ज्याला जे शक्य होईल तेवढे सहकार्य एकमेकांना केले पाहिजे आणि या कठीण प्रसंगाचा न घाबरता सामना केला पाहिजे असे मत रामचंद्र घटे यांनी यावेळी व्यक्त केले.










टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.