Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: दिलासादायक - रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णसंख्या घटली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शहरातील गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या घटतेय शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - दि. १२ : गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या कमी करून त्य...

  • शहरातील गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या घटतेय
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
दि. १२ : गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या कमी करून त्यांना शासकीय कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार करण्याच्या सूचना मा. जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापौर राखी संजय कंचर्लावार व मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या प्रयत्नानंतर शहरातील गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या घटत आहे. शहरात ५ मे रोजी गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या 2416 इतकी होती. ११ मे रोजी ती 1 हजार 981 पर्यंत कमी झाली आहे. या सोबतच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून, एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्याही घटली आहे.

सध्या महानगर पालिका हद्दीत मागील आठवड्यात ८० टक्के रुग्ण गृहविलीगीकरणात होते. अनेकांच्या घरी रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. झोपडपट्टी परिसरात बिकट स्थिती आहे. अशावेळी कोव्हीड संसर्ग पसरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या ४० टक्क्यावर आणण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या. शहरात ५ मे रोजी गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या 2416 इतकी होती. ११ मे रोजी ती 1981 पर्यंत कमी झाली आहे. इतकेच नव्हे तर शहरातील एकूण एक्टिव पॉझिटीव्ह रुग्ण संख्यादेखील कमी होत आहे.

राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका अंमलबजावणी करीत आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची अँटीजन चाचणी, विनामास्क फिरणाऱ्यावर दंड, निर्बंधानंतरही दुकाने सुरु ठेवणाऱ्यावर कारवाई, लसीकरण मोहीम यामुळे सकारात्मक बदल दिसून येत आहेत.

एप्रिलअखेर एक्टिव पॉझिटीव्ह रुग्ण संख्या 4468 इतकी होती. ती ११ मेपर्यंत 3340 पर्यंत कमी झाली आहे. रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. एप्रिलअखेर 14 हजार 328 रुग्ण बरे झाले होते. ही संख्या आज 18 हजार 889 वर पोहचली आहे.

ही बाब दिलासादायक असली तरी नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचे पालन करावे, स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार व मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top