Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर कारवाही
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूर व नांदा फाटा येथे स्थानिक प्रशासन व पोलिसांची विभागाची संयुक्त कारवाई धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - महाराष्ट्...

  • गडचांदूर व नांदा फाटा येथे स्थानिक प्रशासन व पोलिसांची विभागाची संयुक्त कारवाई

धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
महाराष्ट्रात सध्या कोविड १९ चा वाढता पादुर्भाव लक्षात घेत शासनाने मास्क लावणे अनिवार्य केलें असताना गडचांदुर शहरात व नांदा फाटा येथील अनेक नागरिक विनामास्कने वावरत असतांना अनेक ठिकाणीं उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल भारती, गडचांदूर नगर परिषदेचे अधिकारी, नांदा फाटा येथे ग्रामपंचायतीतील कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने कारवाही करत हजारों रुपयांचा दंड वसूल केला. गडचांदूरात २११०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर नांदा फाटा येथील आकडा कळू शकला नाही. सोबतच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या  ३० वाहन चालका विरुद्ध मोटार वाहन कायदा अन्वये कारवाही करण्यात आली. 

तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेल्या गडचांदुर, नांदा या ठिकाणी प्रशासनाने मोहीम राबवित मोठी कारवाही केली. सोबतच मास्क लावण्याची व सामायिक अंतर जोपासनाची जनजागृती सुद्धा केली. यावेळेस ठाणेदार गोपाल भारती, नगर परिषदेचे नगर परिषद व पोलीस विभागाचे कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top