Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांचा पुढाकारातून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या कडून सावली कोविड सेंटर ला 3 तर पाथरी ला 2 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स सावली - केंद्रीय मंत्री, भाजपा नेते ना.नितीन गडकरी यांच्या कडून सावली तालुक्यासाठी 5 ऑक्‍सीजन कॉन्संट्रेटर उप...

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
सावली -
केंद्रीय मंत्री, भाजपा नेते ना.नितीन गडकरी यांच्या कडून सावली तालुक्यासाठी 5 ऑक्‍सीजन कॉन्संट्रेटर उपलब्ध झाले.त्यापैकी 3 मशीन सावली येथील कोविड सेंटर व 2 मशीन पाथरी कोविड सेंटर ला देण्यात आले.

सावली तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत शासन व प्रशासनाची यंत्रणा कमी पडत असतांना ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर करून देण्याची मागणी केली. अतुल देशकर यांच्या विनंतीला प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सावली तालुक्यासाठी 5 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून दिले.

त्यातील सावली येथील कोरोना केयर सेंटरसाठी 3 व पाथरी येथील कोरोना केयर सेंटर साठी 2 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर देण्यात आले. आज सावली येथील कोविड सेंटर ला भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, भाजपा शहराध्यक्ष आशिष कार्लेकर,जेष्ठ नेते प्रकाश खजांची,माजी सरपंच अतुल लेनगुरे,युवा शहराध्यक्ष राहुल लोडेल्लीवार, राकेश विरमलवार, प्रसाद जक्कुलवार,नायब तहसीलदार सागर कांबडे,वैदकीय अधिकारी डॉ.धुर्वे यांचा उपस्तीत कोविड सेंटर सुपूर्द करण्यात आले.

सावली तालुक्यातील जनतेसाठी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top