Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नागपुरात ५ हजार ९९३ नव्या रुग्णांची नोंद ; मृत्यू ५७
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ॲक्टीव कोरोनाबाधितांची संख्या ६३ हजार दिवसभरात ३ हजार ९९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आयशा - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी नागपूर - आरटीपीसीआर च...

  • ॲक्टीव कोरोनाबाधितांची संख्या ६३ हजार
  • दिवसभरात ३ हजार ९९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले

आयशा - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
नागपूर -
आरटीपीसीआर चाचण्या तीन दिवस बंद ठेवल्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट बघायला मिळाली. दिवसभरात जिल्ह्यात ५ हजार ९९३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ५७ मृत्यू नोंदवण्यात आले.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर चाचणी केंद्रांवर गर्दी वाढू लागली. त्यामुळे चाचण्यांच्या रिपोर्ट देण्यासाठी लॅबवरचा भार वाढला होता. यासाठी प्रशासनाने तीन दिवस आरटीसीपीआर चाचण्या बंद ठेवत केवळ अॅन्टिजन चाचण्या केल्या. खासगी प्रयोगशाळांमध्ये मात्र आरटीपीसीआर चाचण्या सुरू होत्या. दरम्यान जिल्ह्यात बुधवारी २१ हजार ५५८ चाचण्यांमधून ५ हजार ९९३ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. यात ३ हजार ६१३ रुग्ण शहरात, तर २ हजार ३७५ रुग्ण ग्रामीणमध्ये नोंदवण्यात आले. अॅक्टिव्ह करोनाबाधितांची संख्या ६३ हजार ५ इतकी झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात दिवसभरात ३ हजार ९९३ रुग्ण घरी बरे होऊन परतले. असे असले तरी महिनाभरापूर्वी ९४ टक्क्यांवर असलेला रुग्ण बरे होण्याचा दर ७६.७८ टक्क्यांवर आला आहे. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top