Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरोना विस्फोट ; बाबानों काळजी घ्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
13 जनांचा मृत्यू ; 24 तासात 1235 बाधितांची नोंद आज 332 कोरोनामुक्त ; ॲक्टीव पॉझिटिव्ह 7439 आतापर्यंत 28,780 जणांची कोरोनावर मात वाचा सविस्तर...

  • 13 जनांचा मृत्यू ; 24 तासात 1235 बाधितांची नोंद
  • आज 332 कोरोनामुक्त ; ॲक्टीव पॉझिटिव्ह 7439
  • आतापर्यंत 28,780 जणांची कोरोनावर मात
  • वाचा सविस्तर....

श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -

दि. 14 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 332 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1235 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 13 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 36 हजार 748 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 28 हजार 780 झाली आहे. सध्या 7439 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 12 हजार 440 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 69 हजार 973 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 35 वर्षीय व 45 वर्षीय पुरुष तसेच श्रीराम वार्ड येथील 70 वर्षीय महिला, झाकीर हुसेन वार्ड बल्लारपूर येथील 55 वर्षीय पुरुष, बामनी बुधोली बल्लारपूर येथील 72 वर्षीय पुरुष, मूऊ येथील 46 वर्षीय पुरुष, वरोरा शहरातील 45 वर्षीय पुरुष, भिसी चिमूर येथील 45 वर्षीय पुरुष, चिमूर येथील 55 वर्षीय महिला, जिवती येथील 45 वर्षीय महिला, अहेरी येथील 60 वर्षीय महिला, जुमाठा वार्ड वरोरा येथील 70 वर्षीय पुरुष, केमिकल वार्ड, घुग्गुस येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 529 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 483, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 21, यवतमाळ 20, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1235 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 302, चंद्रपूर तालुका 87, बल्लारपूर 83, भद्रावती 100, ब्रम्हपुरी 98, नागभिड 39, सिंदेवाही 23, मूल 22, सावली आठ , पोंभुर्णा सहा, गोंडपिपरी चार, राजूरा 30, चिमूर 152, वरोरा 219, कोरपना 23, जीवती 17 व इतर ठिकाणच्या 22 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top