Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लाट कोरोनाची ; मृत्यू संख्येत वाढ चिंतनीय
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
16 मृत्यूसह चंद्रपूर जिल्ह्यात 640 नव्या बाधितांची भर मागील 24 तासात 194 जणांनी कोरोनावर मात वाचा सविस्तार कुठले किती रुग्ण व मृत्यु श्रावण ...

  • 16 मृत्यूसह चंद्रपूर जिल्ह्यात 640 नव्या बाधितांची भर
  • मागील 24 तासात 194 जणांनी कोरोनावर मात
  • वाचा सविस्तार कुठले किती रुग्ण व मृत्यु

श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 10 एप्रिल -
जिल्ह्यात मागील 24 तासात 194 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 640 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 16 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 32 हजार 592 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 27 हजार 454 झाली आहे. सध्या 4657 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 98 हजार 710 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 60 हजार 434 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये गडचांदूर येथील 39 वर्षीय पुरुष, चंद्रपूर शहराच्या

तुकुम येथील 55 वर्षीय पुरुष, ट्रेझरी कॉलनी येथील 87 वर्षीय महिला, बाबुपेठ येथील 55 वर्षे पुरुष, महाकाली वार्ड येथील 59 वर्षीय पुरुष, सिस्टर कॉलनी येथील 56 वर्षीय महिला, वोल्टास सागर कॉलनी, वरोरा येथील 58 वर्षीय पुरुष, नेताजी वार्ड चीमूर येथील 41 वर्षीय महिला, पांजरेपार चिमूर येथील 70 वर्षीय पुरुष, कृष्णानगर भद्रावती येथील 60 वर्षीय पुरुष, बुटीबोरी नागपूर येथील 50 वर्षीय पुरुष, नागभीड येथील 73 वर्षीय महिला, हार्डोना ता. राजुरा येथील 37 वर्षीय पुरुष, राधे गाव तालुका गोंडपिंपरी येथील 45 वर्षीय पुरुष, नेहरू वार्ड चिमूर येथील 78 वर्षीय पुरुष व भद्रावती येथील 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 481 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 437, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 19, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 640 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 217, चंद्रपूर तालुका 28, बल्लारपूर 18, भद्रावती 73, ब्रम्हपुरी 41, नागभिड 11, सिंदेवाही 22, मूल 38, सावली 10, पोंभुर्णा दोन, गोंडपिपरी सात, राजूरा 25, चिमूर 46, वरोरा 51, कोरपना 26, जीवती 18 व इतर ठिकाणच्या 7 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top