Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दुःखद वार्ता - पत्रकार गणपत खोबरे यांचे दुःखद निधन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चिमूर - पुण्य नगरीचे चिमूर तालुका प्रतिनिधी तथा चिमूर तालुका पत्रकार संघाचे सचिव गणपतजी खोबरे यांचे कोरो...

मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चिमूर -
पुण्य नगरीचे चिमूर तालुका प्रतिनिधी तथा चिमूर तालुका पत्रकार संघाचे सचिव गणपतजी खोबरे यांचे कोरोना मुळे आज मध्यरात्रीच्या सुमारास दु:खद निधन झाले. एक प्रामाणिक निर्भीड समाजसेवक, सच्चा पत्रकार आणि चिमूर तालुका पत्रकार संघाचा आधारवड असलेले गणपतजी खोबरे यांना कोरोनाची लागण झाली होती.

मागील अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात गणपत खोबरे कार्यरत होते,त्यांनी नुकताच डिजिटल मीडियात प्रवेश घेत, जनसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला मात्र निर्भीड व्यक्तिमत्त्व असलेला हुरहुन्नरी पत्रकार कोरोनापुढे हरला,त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची हानी झाली आहे. अनेक पत्रकारांचा सच्चा मित्र म्हणून त्यांची ओळख होती, चिमूर सहित चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकार क्षेत्रात दुःखाचे वातावरण पसरले आहे. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top