Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांची जिवती तालुक्यातील ग्राम पंचायत माराई पाटण येथे भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ग्राम पंचायत परिसराची स्वच्छता बघून केले कौतुक राजेश राठोड - आमचा विदर्भ प्रतिनिधी जिवती - जिवती तालुक्यातील ग्राम पंचायत माराई पाटण येथे जि...

  • ग्राम पंचायत परिसराची स्वच्छता बघून केले कौतुक
राजेश राठोड - आमचा विदर्भ प्रतिनिधी
जिवती -
जिवती तालुक्यातील ग्राम पंचायत माराई पाटण येथे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी अचानक भेट दिली. यावेळी अनेक बाबींचा आढावा घेण्यात आला. यात जनसुविधा, समाजकल्याण, १५ वा वित्त आयोग, पेसा, व इतर योजनेतून प्रस्तावित असलेल्या पूर्ण व अपूर्ण कामाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी ग्राम पंचायत परिसराची स्वच्छता बघून कौतुक सुद्धा केले. तसेच जगामध्ये सुरू असलेल्या कोरोना या महामारी वर सुरू असलेली उपाय योजना, जनजागृती व प्रचार यांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले.   

यावेळी उपस्थित सौ. गोदावरी केंद्रे सदस्या जिल्हा परिषद, महेश देवकते उपसभापती पंचायत समिती जिवती, सुरेश केंद्रे, दत्ता राठोड, प्रल्हाद काळे उपसरपंच,  जयप्रकाश मोहूर्ले ग्राम सेवक, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top