Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गावाची विद्युतखंडित करणारा तो अज्ञात इसम कोण ?
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विद्युतखंडित करतांना आढळल्यास शिवसेना स्टाईल ने धडा शिकवू - बबन उरकुडे अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - राजुरा तालुक्यात...

  • विद्युतखंडित करतांना आढळल्यास शिवसेना स्टाईल ने धडा शिकवू - बबन उरकुडे

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील गोवरी गावात वारंवार विद्युत खंडित होण्याचा प्रकार मागील काही दिवसापासून सुरु आहे. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे गावातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी कमी क्षमतेची असल्यामुळे व वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे ग्रामस्थांना बरोबर पाणी पुरवठा सुद्धा होत नाही आहे. वारंवार खंडित होत असलेला विद्युत पुरवठा यावर नवनिर्वाचित सरपंच आशाताई उरकुडे व शिवसैनिक बबन उरकुडे यांनी बारकाईने लक्ष दिले असता कोणीतरी विद्युत डीपीमधून अज्ञात इसमाद्वारे जाणूनबुझून लाईट बंद करत असल्याचे प्राथमिकदृष्ट्या लक्षात आले आहे. या गंभीर बाबीची बाब लक्षात येताच संबंधित महावितरण अधिकाऱ्यांना याविषयी माहिती देऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

पुन्हा वारंवार गावाची विद्युतखंडित झाल्यास अज्ञात इसमाच्या समाजविघातक हालचालीवर आता शिवसैनिकांनी लक्ष केंद्रित केले असून विद्युतखंडित करतांना आढळल्यास शिवसेना स्टाईल ने धडा शिकवू असा सज्जड इशारा शिवसैनिक बबन उरकुडे यांनी दिला आहे.





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top