Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ईलेक्ट्रॉनिक्स तसेच अन्य व्यावसायिकांनी प्रामाणिकतेने व्यवसाय करावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे आवाहन आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी भद्रावती - शहरातील ग्राहकांच्या प्राप्त तक्रारीनुसार काही प्रतिष्ठीत ईलेक्ट...

  • अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे आवाहन

आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
भद्रावती -
शहरातील ग्राहकांच्या प्राप्त तक्रारीनुसार काही प्रतिष्ठीत ईलेक्ट्रॉनिक्स दुकानदार खोटे बोलुन सामान विक्री करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.

तक्रार ही कुलरच्या संर्दभातील असुन कुलर मधील मोटर कॉपर वाईंडींगची आहे असे सांगुन अँल्युमिनीयम वाईंडींगची मोटर असलेले कुलर कॉपर वाईंडींगच्या  ज्यादा भावाने विकल्या जात आहे. शिवाय ग्राहकाने तक्रार केल्यास त्याला उडवा उडवीचे उत्तरे देत आहेत. त्यामुळे साधारण ग्राहकांची ही फसवणुक आहे.

खऱ्या किंमतीपेक्षा जास्त किंमत सामानावर लिहुन ठेवतात आणि तुमच्या साठी कमी करतो म्हणुन सरळ दोन ते तिन हजार रूपये कमी करतात. यात ग्राहकाला कमी किंमत केल्याचे समाधान करून वाजवी किंमतीपेक्षा जास्त दराने सामान विक्री केले जाते. काही दुकानदार तर विकेलेले सामान खराब झाल्यास वॉरंटी संपेपर्यंत खोटे बोलुन वेळ काढुन घेतात आणि वॉरंटी संपली की हात वर करतात. त्यामुळे शहरातील सर्व दुकानदार बांधवांनी प्रामाणिकपणे व्यवसाय करावे अशी विनंती ग्राहक पंचायतने केली आहे. आता पुन्हा अशी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधीत दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल. असा इशारा अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांनी शहरातील सर्व दुकानदारांना दिला आहे.

ग्राहकांना आवाहन
दरम्यान, अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडुन सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे की, जागृक बना. कुठल्याही सामानाची खरेदी करतांना पक्के बिल, गॅरंटी - वॉरंटी कार्ड घ्या. कोणत्याही दुकानदाराकडुन आपली फसवणुक झाली असे वाटल्यास, घेतलेल्या वस्तुमध्ये दोष आढळल्यास, दुकानदार वस्तु घेतल्यानंतर दोष असलेल्या वस्तु बदलुन किंवा दुरूस्त करून देत नसल्यास लेखी तक्रार अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांचे कड़े करावी. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top