Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नियमांचे उल्लंघन ; चंद्रपूर शहरातील गोल बाजार परिसरात मनपाची कारवाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर १२ एप्रिल - शासनाने आखुन दिलेल्या कोव्हीड नियमांचे पालन न करणाऱ्या श्री संताजी जगनाडे महाराज वस्त...

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर १२ एप्रिल -
शासनाने आखुन दिलेल्या कोव्हीड नियमांचे पालन न करणाऱ्या श्री संताजी जगनाडे महाराज वस्तीगृह, सिटी मोबाईल शॉपी, गोपाल ट्रेडींग कंपनी, पाकिजा शॉपी, फॅशन क्वीन या प्रतिष्ठानांवर चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई केली असुन सर्वांना प्रत्येकी ५००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

मनपा पथकामार्फत झोन क्र. 1 अंतर्गत पाहणी सुरु असताना गोल बाजार, गांधी चौक ते जटपूरा रोडवरील 4 दुकाने सुरु असल्याचे निदर्शनास आल्यामुळे  दुकान मालकास प्रत्येकी रु. ५०००/- असे एकूण 20000/ रूपये दंड करण्यात आला. तसेच दुकान मालकांना प्रतिष्ठाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच झोन क्र. ३ अंतर्गत पाहणी सुरु असताना श्री संताजी जगनाडे महाराज वस्तीगृहात लग्न कार्य सुरु असल्याचे आढळून आले. या लग्न कार्यात ५० पेक्षा जास्त लोक असल्याचे निदर्शनास आल्यामुळे श्री संताजी जगनाडे महाराज वस्तीगृहाचे व्यवस्थापकास रु. ५०००/- दंड करण्यात आला व त्यांना समज देण्यात आली.

कोरोना बाधीतांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होताना दिसत असून कोव्हीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक काळजीपूर्वक व काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज असुन यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष अपेक्षित नाही असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यावेळी यावेळी सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, विद्या पाटील, सुरक्षा अधीकारी राहुल पंचबुद्धे व कर्मचारी उपस्थित होते. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top