- जिल्ह्यात आजपर्यंत 3 लाख 57 हजार 262 कोरोना तपासण्या पुर्ण
- आर.टी.पी.सी.आर. च्या 1 लाख 77 हजार 144 तर
- ॲन्टीजेनच्या 1 लाख 80 हजार 118 तपासण्या पुर्ण
जिल्ह्यात सुरवातीला कोरोना चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत नमूने पाठवले जात होते. तेथून अहवाल यायला वेळ लागत असल्याने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्याकरिता व्ही.आर.डी.एल. प्रयोगशाळा सुरू करण्यात येवून येथे 4 जून 2020 पासून स्वॅब नमूने तपासणीची आर.टी.पी.सी.आर. मशीन बसविण्यात आली. जिल्हा स्र्ी रूग्णलयातील व्ही.आर.डी.एल. प्रयोगशाळेत बसविण्यात आलेल्या या मशीनवर आतापर्यंत 1 लाख 53 हजार 623 नमूने तपासण्यात आले आहेत.
मशीनची क्षमता सुरवातीला प्रतिदिवस 360 नमुने तपासणी करण्याची होती. ती पुढे वाढवून 720 व आता 1200 अशी टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली. यात अजून वाढ करण्यासाठी लागणरी यंत्रसामग्री आणि साहित्य उपलब्ध करण्याचे काम प्रशासनातर्फे युद्पातळीवर सुरू आहे. सध्या या मशीनची क्षमता 1200 असतांनाही त्यावर सुमारे 2000 ते 2500 नमुने दररोज तपासण्यासाठी येत आहेत. या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ तीन शिफ्टमध्ये अहोरात्र काम करून मशीनच्या क्षमतेपेक्षा दुपटीने नमुने दररोज तपासून रुग्णांना 24 तासाच्या आत चाचण्यांचे अहवाल उपलब्ध करून देत आहेत. मात्र चंद्रपूर जिल्हा भौगोलिक दृष्ट्या मोठा आहे. चंद्रपूर पासून चिमूर, नागभिड व ब्रम्हपुरी हे तालुके 100 ते 150 कि.मी. अंतरावर असून लांब अंतरावर असल्याने नमुने संकलीत करून तपासणीसाठी येईपर्यंत वेळ लागतो, त्यामुळे या नमुन्यांचे तसेच क्षमतेपेक्षा अधीक संकलीत झालेल्या काही नमुन्यांचे रिपोर्ट संबंधीतांना मिळायला काहीवेळा 36 तासांचा अवधी लागतो. यासाठी मशीनची क्षमतावाढ व त्याप्रमाणात तंत्रज्ञ वाढविणे अत्यावश्यक आहे.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्यापुर्वी दररोज साधरणत: 500 पर्यंत होणाऱ्या तपासण्यामध्ये आता 4500 पर्यंत वाढ झाली आहे. सध्या ॲन्टीजन च्या सुमारे 2300 ते 2500 तर आर.टी.पी.सी.आर. च्या सुमारे 2000 ते 2500 तपासण्या दररोज करण्यात येत आहेत. माहे फेब्रुवारी मध्ये 6087 असणाऱ्या आर.टी.पी.सी.आर. तपासण्यांचा आकडा माहे मार्च मध्ये 24 हजार 364 तर 1 एप्रिल ते 25 एप्रिल पर्यंत 36 हजार 11 वर गेला आहे. मागील दहा दिवसात या प्रयोगशाळेत आर.टी.पी.सी.आर. च्या 18 हजार 706 चाचण्या करण्यात आल्या आहेत. यावरून येथील कामाच्या व्यापात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे लक्षात येते. या कठीण प्रसंगात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अधिष्ठाता डॉ.अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांच्याकडून वेळोवेळी प्रयोगशाळेला सहकार्य केल्या जात असल्याचे सध्याचे प्रयोगशाळा प्रभारी डॉ. भाऊसाहेब मुंडे यांनी सांगितले. कोरोना तपासण्या अधिक प्रमाणात झाल्यास नागरिकांना अधिक जलद अहवाल मिळून बाधीतांवर वेळेत उपचार सुरू करता येईल, त्यामुळे संभाव्य प्राणहाणी टळेल तसेच कोरोना फैलावासही अटकाव करता येईल. त्यामुळे जिल्ह्यात अधिक एक व्ही.आर.डी.एल. प्रयोगशाळा सुरू करावी यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने हे प्रयत्नशील आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.