Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पुलावरून दुचाकी पडली ; एक मृत एक जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मृतक राजुरा तालुक्यातील मूर्ती गावाचा स्वप्नील वाढई - आमचा विदर्भ प्रतिनिधी (ग्रामीण) राजुरा  - मानोरा-उमरी रोड वरील पुला वरून जात असतांना द...

  • मृतक राजुरा तालुक्यातील मूर्ती गावाचा
स्वप्नील वाढई - आमचा विदर्भ प्रतिनिधी (ग्रामीण)
राजुरा  -

मानोरा-उमरी रोड वरील पुला वरून जात असतांना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना ५ एप्रिल ला दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास घडली. मृतकाचे नांव गणेश रमेश मडावी वय 24 असून तो राजुरा तालुक्यातील मूर्ती गावचा रहिवासी होता. चेतन प्रभाकर डाखरे वय 28 हा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजुरा तालुक्यातील मूर्ती येथील मृतक गणेश मडावी व चेतन डाखरे हे घाटकुरला दुचाकी क्रमांक MH 34 AU 3689 ने 

लग्नाकरिता निघाले होते. लग्नाला जात असतांना मानोरा-उमरी रोड वरील पुला वर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघे पुलावरून खाली पडले. त्यात रमेशचा जागीच मृत्यू झाला तर चेतन गंभीर जखमी झाला. चेतनचा चंद्रपुरात दवाखान्यात उपचार सुरु आहे. मनमिळावू स्वभावाचा मृतक गणेश मडावी शेतमजुरी करत होता. आई-बाबाचा एकच अपत्य असल्यामुळे कुटुंबावर तसेच गावात शोककळा पसरली आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top