- ऑक्सिजन बेडसाठी दोन राज्यात नातेवाईकांची धावपळ
- भयंकर कोरोना स्थिती
संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्य़ात बेड न मिळाल्याने संजयचे भाऊ संतोष घटे यांनी स्वतःची चारचाकी काढत थेट तेलंगण्यातील करीमनगर ला नेले. तेथे ऑक्सिजन बेड मिळवून उपचार सुरू केले मात्र तेथेही एका दिवसात ऑक्सिजन तुटवडा झाल्याने त्यांना मंचेरियल जवळील एका मोठ्या दवाखान्यात नेण्यात आले. तेथेही एक रात्रभर ऑक्सिजन मिळाले. शेवटी आज पून्हा एका दुसर्या दवाखान्यात शिफ्ट करण्यात आले मात्र केवळ आणि केवळ ऑक्सिजन च्या अभावाने आणि प्रशासनाच्या जीवघेण्या नियोजनामुळे संजय घटे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. ते वेकोली बल्लारपूर क्षेत्रातील नियोजन अधिकारी जी.पूल्लया यांच्या अपमानास्पद वागणूकीने त्रस्त होऊन आत्महत्या करून जीवन संपविणाऱ्या आशा घटे हिचे मोठे वडील होते. तीला न्याय मिळवून देण्यासाठी ते पत्रकार, पोलीस अधीक्षक, नेते यांच्या भेटी घेऊन झटत होते. आजघडीला आशा घटे हिला जाऊन २० दिवस पुर्ण होत आलेत, वेकोली अधिकाऱ्यांवर काहीही कारवाई झाली नाही मात्र तीला न्याय मिळवून देण्यासाठी झटनारा शिपाई कोरोनामुळे हरवला. ते ४८ वर्षाचे होते त्यांच्या नंतर पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ आणि साखरी, राजुरा येथील बराच मोठा आप्त परिवार शोकाकुल आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.