- उद्घाटना अभावी ग्राम पंचायतला हस्तांतर नाही
राजुरा -
तेलंगणा-महाराष्ट्र टोकाचा सीमेवरील राजुरा तालुक्यातील लक्कलकोट येथे राज्यपाल निधीतून बांधण्यात आलेले राजभवन केवळ उद्घाटन झाले नसल्याने ग्रामपंचायत कडे हस्तांतर केले नाही. परिणामी संबंधित विभागाचे दुर्लक्षित कारभारामुळे हे भवन बेवारस झाले असून अवैध धंद्याचे मोकाट स्थळ झाले आहे. तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांचे हस्ते लक्कलकोट येथे या राजभवना चे भूमिपूजन करण्यात आले होते. राज्यपाल निधी अंतर्गत राजभवन असल्याने बांधकामही सुंदर भव्य करण्यात आले. परंतु, या भवनाचे उद्घाटन करण्यात आले नाही म्हणून ग्रामपंचायत कडे हे भवन हस्तांतरित करण्यात आले नाही. दरम्यान तत्कालीन अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते उद्घाटन ही ठरले होते. परंतु काही कारणास्तव ते रद्द झाले त्यानंतर परत उद्घाटनाची तयारी करण्यात आली परंतु तीही रद्द करण्यात आली. आज नाही उद्या अश्या उद्घाटनाची वाट पाहत मात्र हे भवन आणि परिसर आता पूर्णतः बेवारस झाले असून सभोवताल झुडुपे वाढली आहे. मोकाट जनावरे येथे चरत असून इमारतीचे खिडकी, दरवाजे मोडकळीस आले आहे, चोरून लपून दारू पिण्यासाठी चा अड्डा हे राजभवन झाले आहे. राज्यपाल निधीतील राजभवन ची अशी अवस्था पाहून संबंधित विभागाचा अधिकाऱ्यांबाबत मात्र आता गावकऱ्यांत आता तीव्र संताप व्यक्त होत आहे. तात्काळ या परिसराची साफसफाई करून ग्रामपंचायत कडे हे भवन हस्तांतर करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.