Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वरोरा शहरात सहा दिवसांचा जनता कर्फ्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
13 एप्रिल ते 18 एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यू आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स वरोरा - वरोरा शहरात मोठया प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आह...

  • 13 एप्रिल ते 18 एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यू
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
वरोरा -
वरोरा शहरात मोठया प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याअनुषंगाने ब्रेक द चेन या शासकीय निर्बंधाचे अवलंब करुन सुध्दा मागील तीन दिवसात मोठया प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्व व्यापारांची चर्चा केली असता तसेच लोकप्रतिनिधी आमदार मॅडम यांचेशी चर्चा केली असता सर्वांचे असे मत आढळून आले की, सर्व छोटी/ मोठी जिवनावश्यक दुकाने, सर्व भाजीपाला केंद्रे, भाजीपाला विक्रीची दुकाने सर्व 100% उत्स्फुर्तपणे बंद ठेवल्यास ब्रेक द चेन नुसार मोठया प्रमाणावर कोरोना साखळी तुटण्यास मदत होईल. त्यामुळे उद्या दिनांक 13 एप्रिल 2021 पासुन 18/04/2021 पर्यंत वरोरा शहरातील सर्व दुकाने, सर्व आस्थापना 100% बंद ठेवल्या जातील. त्यामुळे दिनांक 13 एप्रिल, 2021 पासुन 18/04/2021 पर्यंत सहा दिवसांचा जनता कर्फु ठेवण्याचे आवाहन वरोरा तालुक्यातील जनतेला प्रशासनातर्फे तसेच लोकप्रतिनिधी तर्फे करण्यात येत आहे. तरी या सहा दिवसामध्ये जनेतेने घराबाहेर पडु नये आणि काळजी घ्यावी. आणि त्याचदरम्यान आज दिनांक 12/04/2021 पासुन ILI व SARI चे सर्वे करणा-या पथकांना सहकार्य करावे. तसेच आपणाला ILI व SARI चे कोणतीही लक्षणे असतील तर ती तात्काळ कळवावीत. ज्यांना याची लक्षणे असतील त्यांची टेस्ट तात्काळ करुन घेण्यात येतील आणि त्यांना आवश्यकता भासल्यास विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. तालुक्यात एक कोविड सेंटर आधीच स्थापन केलेले आहे आणि त्याचबरोबर आणखी एक सिध्दीविनायक मंगल कार्यालय, खांजी कोविड सेंटर करीता अधिग्रहीत करण्याबाबतची तजवीज प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे ज्यांना होम आयशोलेशन शक्य नाही त्यांना या कोविड सेंटर मध्ये ठेवण्यात येईल. 





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top