- १० आरोपींना अटक ; ७३ लाख ७२ हजाराचा मुददेमाल जप्त
- तीन वेगवेगळ्या पथकाची धडक
चंद्रपूर -
मा. पोलीस महासंचालक मुंबई, मा. अपर पोलीस महासंचालक मुंबई तसेच पोलीस महानिरीक्षक नागपुर परीक्षेत्र नागपुर, यांचे अवैध रेती तस्करांवर जिल्हयात धडक कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधिक्षक अरवींद साळवे यांना आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसार पोलीस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या साहाय्याने तिन वेगवेगळे पथक तयार केले.
सदर पथकाने गोपनीय माहिती आधारे जिल्हयातील रामनगर, चंद्रपुर शहर, सिंदेवाही, भद्रावती, राजुरा या पोलीस हददीतील माहीती संकलीत करून पो.स्टे. रामनगर येथे ३ गुन्हे, पो.स्टे. चंद्रपुर शहर येथे २ गुन्हे, पो.स्टे. सिंदेवाही येथे २ गुन्हे, पो.स्टे. भद्रावती येथे २ गुन्हे, पो.स्टे. राजुरा येथे एक गुन्हा असे एकुण १० गुन्हे नोंद करून अवैध रेती चोरी करणाऱ्या रेतीतस्करांवर कार्यवाही करून १० आरोपींना अटक करण्यात आली. या कार्रवाहीत एकुण ७३ लाख ७२ हजार ५०० रू.चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
चंद्रपुर जिल्हयात रेती माफीयांवर आळा घालण्याकरीता त्यांचे विरूदध धडक कार्यवाहीचे सत्र स्थानिक गुन्हे शाखे कडुन सुरू करण्यात आले असुन अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी अधिक गोपनीय माहिती घेऊन कार्यवाही करणे सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.