Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Live: लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल - देवेंद्र फडणवीस पूर्ण लॉकडाऊनही नको...

  • Live: लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल - देवेंद्र फडणवीस
  • पूर्ण लॉकडाऊनही नको आणि सर्व सुरु नको, मध्यबिंदू काढा- अशोक चव्हाण
  • राज्यातील करोना परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
मुंबई -
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांवर आळा घालण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन केला जाऊ शकतो. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या संदर्भात निर्णय घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यात राज्यातील लॉकडाऊनवर निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, यापूर्वीच राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरु झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अशा अनेक नेत्यांची उपस्थिती आहे.

लॉकडाऊनवर एकमताने निर्णय घेऊ- उद्धव ठाकरे
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, 'कोरोना लसीचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. हा मुद्दा पंतप्रधान मोदींसमोर मांडला होता. सध्या कोरोनाची साखळी तोडणं आणि आरोग्य सुविधा वाढवणं गरजेचं आहे. लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास तो एकमताने घेतला गेला पाहिजे. कालच निर्णय झाला असता पण देवेंद्रजी आपण नव्हता म्हणून आजची ही बैठक बोलावली आहे. लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, असे मत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडले.

कडक लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल - देवेंद्र फडणवीस
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोरोना रुग्ण वाढत आहेत, यासाठी निर्बंध असायला हवे. पण, कडक लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल. आपण, जनतेचा उद्रेक लक्षात घेतला पाहिजे.

मध्यबिंदू काढा - अशोक चव्हाण
यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मध्यबिंदू काढण्याचा मार्ग सुचवला. ते म्हणाले की, आव्हानात्मक परिस्थिती आहे. लॉकडाऊन किंवा निर्बंध लावायचे असतील तर गरिबांचंही नुकसान होणार नाही अशी व्यवस्था करावी लागेल. पूर्ण लॉकडाऊनही नको आणि सर्व सुरु नको, मध्यबिंदू साध्य करायला हवा.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top