Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी घेतला कोरपना तालुक्यातील पाणी टंचाई नियोजनाचा आढावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी १ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिध...

  • आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी १ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
पंचायत समिती कोरपना अंतर्गत येणाऱ्या गावात पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू रहावे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी टंचाईस सामोरे जावे लागते. त्यामुळे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासंदर्भात पावले उचलली जावित अशा सुचना आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या तसेच यासंदर्भात विभागास येणाऱ्या अडचणी, ग्रामपंचायत स्तरावर येणाऱ्या अडचणी सुद्धा त्यांनी जाणून घेतल्या.

या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सन २०२०-२०२१ या वर्षात आत्महत्याग्रस्त शेतकरी पात्र लाभार्थी चंद्रकला मोतीराम तोडासे राहणार कोठोडा (बु.) तसेच सविता मंगेश तिखट राहणार निमनी यांना प्रत्येकी १ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. 

या प्रसंगी उपसभापती सिंधुताई आस्वले, जिप सदस्य कल्पनाताई पेचे, जिप सदस्य विनाताई मालेकर, जिप सदस्य शिवचंद्र काळे, माजी उपसभापती संभा पाटील कोवे, माजी जि.प. सदस्य उत्तमराव पेचे, सुरेश मालेकर, प्रा.आशिष देरकर, स.नि.यो. अध्यक्ष प्रा.उमेश राजुरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, दक्षता समिती सदस्य विलास मडावी, अभय मुनोत, नायक तहसिलदार चिडे, सहयक उपअभियंता दराडे, सहभियांता विद्युत विभाग इंदूरकर, कोरपना तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्राम सेवक उपस्थित होते. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top