Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: संत रामराव महाराज याचे विचार आणि कार्य प्रेरणादायी - आमदार सुभाषभाऊ धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - बंजारा समाजाचे थोर संत रामराव बापू महाराज यांनी संत सेवालाल महाराजांचे विचार कार्याचा प...


अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
बंजारा समाजाचे थोर संत रामराव बापू महाराज यांनी संत सेवालाल महाराजांचे विचार कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम त्यांनी आजन्म केले. बंजारा समाजाला नवी दिशा आणि बळ देण्याचं काम त्यांनी केले. बंजारा समाजामध्ये रामराव बापू यांचा शब्द अंतिम असे. बंजारा समाजा बरोबरच इतर धर्मीयांमध्येही परमपूज्य रामराव बापू यांचे एक आदराचे स्थान आहे. यांच्या कार्याची दखल घेत कर्नाटकमधील गुलबर्गा विद्यापिठाने त्यांना डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले होते. केंद्र सरकारने रामराव बापू यांचा पद्मभूषण पुरस्कारांने गौरव केला होता. त्यांच्या जाण्याने बंजारा समाजाची मोठी हानी झाली आहे. बंजारा समाजाचे आद्य धर्मगुरू संत रामराव महाराज पोहरादेवीकर, यांच्या दुःखद निधनाने एका महान तपस्वी संतास समस्त भक्तगण मुकले आहेत. त्यांचे विचार, त्यांनी केलेले कार्य जगाच्या कल्याणासाठी सदैव प्रेरणा देत राहील अशी भावना आमदार सुभाष धोटे यांनी जिवती तालुक्यातील शेवगाव येथे संत रामराव महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रसंगी व्यक्त केले. या प्रसंगी माजी आमदार एड. संजय धोटे, सद्गुरू प्रेमसिंग महाराज, नगराध्यक्ष अरुण धोटे, मोतीलाल महाराज या सर्वांच्या हस्ते परमपूज्य डॉ. रामराव बापू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

या प्रसंगी सुरेश केंद्रे, गोदावरी केंद्रे जि.प. सदस्य, प्रेमदास राठोड, प्रलाद राठोड, शंकर नाईक, बापुलाल महाराज, बंडू राठोड, भिमराव पवार, देविदास साबणे, शबिर मामु, दाजीबा राठोड, आनंदराव राठोड, ताजुद्दिन शेख, शबीर भाई, बंजारा समाजातील नागरिक उपस्थित होते. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top