Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विरूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कडेमाजी आमदार अँड. संजय धोटे यांच्या माध्यमातून मागणी अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी...

  • माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कडेमाजी आमदार अँड. संजय धोटे यांच्या माध्यमातून मागणी
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरूर स्टेशन -

राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे प्राथमिक आरोग्य केंद्र चे बाधकाम पूर्णतः झालेले असून उपरोक्त बांधकामास अँड.संजय धोटे मा.आमदार यांच्या कार्यकाळात निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. पंरतु विरुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण होऊन सुद्धा आद्यपही आरोग्य केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे विरुर व परिसरातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सदर बाबीची दखल घेत भाजयुमो चे हितेश गाडगे यांनी माजी आमदार अँड. संजय धोटे यांच्या माध्यमातून माजी वित्त मंत्री तथा पालकमंत्री,आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विरुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ सुरू करण्याबाबत मागणी केली आहे.

कोरोनाचे पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा सुरळीतपणे नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी अँड. संजय धोटे यांनी शासनाला व माजी वित्तमंत्री तथा लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे केलेली आहे.

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत सदर बांधकामास सहा कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. जिल्हा परिषद चंद्रपूर बांधकाम विभाग द्वारा उपरोक्त रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून सदर रुग्णालय आरोग्य विभागाच्या वतीने हस्तांतरित करून त्वरित सुरू होणे आवश्यक आहे. सदर रुग्णालयात उपचारासाठी तातडीने साहित्य उपलब्ध करून द्यावेत व पदभरती करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. 

माजी वित्तमंत्री तथा लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना कोरोनाचे पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरित सुरू करण्यासाठी उपरोक्त कार्यवाही त्वरित करावी असे सांगितले. 

या दुर्गम क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी तथा गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरित सुरू करावे अशी विनंती माजी आमदार अँड संजय धोटे यांना केली होती. सदर रुग्णालय सुरू झाल्यास त्या क्षेत्रातील नागरिकांना आरोग्य तपासणी करिता ईतरत्र जावे लागणार नाहीत. त्या भागातील नागरिकांना त्वरित उपचार घेणे सोईचे होईल. यावर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संपर्क करून विरुर येथील आरोग्य केंद्र सुरू करण्याबाबत सूचना वजा आदेश दिले आहेत. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top