Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: औद्योगिक क्षेत्रात विनापरवानगी ऑक्सीजन वापरावर जिल्हा प्रशासनाची मनाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या ऑक्सीजनच्या वितरणावर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्बंध लादले ...


शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या ऑक्सीजनच्या वितरणावर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्बंध लादले असून ऑक्सीजनचा वापर विनापरवानगी औद्योगिक क्षेत्रात करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ यांची जिल्हा ऑक्सीजन नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय ऑक्सीजनचा वापर कोविड रूग्णांखेरीज इतरत्र होत असल्याचे आढळून आल्यास त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

यासंदर्भात कालच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी एम.आय.डी.सी. येथील आदित्य ऑक्सीजन प्लांटला भेट देऊन तेथील ऑक्सीजनचे वितरण जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार केवळ कोविड उपचारासाठी करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी ऑक्सीजनचे किती उत्पादन होते आणि त्याचे वितरण कसे व कुठे कुठे होते याबाबत तपासणीदेखील केली. जिल्ह्यात ऑक्सीजनची उत्पादन क्षमता वाढविण्यात यावी व यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी दिले. याप्रसंगी तहसीलदार निलेश गोंड व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड हे उपस्थित होते.  





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top