- भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची दालमिया सिमेंट कंपनीकडे मागणी
नारंडा येथील एकूण सद्यस्थितीत ३ तलाव असून मागच्या वर्षी जलयुक्त शिवार योजने अंतर्गत लघु सिंचाई तलावाचे खोलीकरण करण्यात आले. तसेच एका वनतलावाची निर्मिती करण्यात आलेली आहे.परंतु गावतलावाचे खोलीकरण करण्यात आलेले नव्हते.त्यामुळे येथील पाणीसाठा हा दरवर्षी कमी असतो. तसेच वनतलावाची निर्मिती मागील वर्षी करण्यात आलेली असून त्याचेसुद्धा खोलीकरण व रुंदीकरण केल्यास पाणीपातळी मध्ये वाढ होण्यास मदत होईल त्यामुळे खोलीकरण करणे अत्यावश्यक आहे. तसेच पाणीपातळी मध्ये वाढ झाल्यास आजूबाजूच्या शेतीला त्याचा फायदा होईल त्यांच्या शेतातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल व शेतकऱ्यांना सिंचन करण्यास मदत होईल.
सदर सर्व बाबी लक्षात घेता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी दालमिया सिमेंट कंपनीचे शाखा प्रबंधक सुनील भुसारी यांच्याकडे केलेली आहे. तरी आपण सदर प्रकरणावर लवकरात लवकर योग्य कार्यवाही करून या संदर्भात सकारात्मक कार्यवाही करू असे दालमिया सिमेंट कंपनीचे शाखा प्रबंधक सुनील भुसारी यांनी यावेळी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.