Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कूलरमध्ये पाणी भरत असताना करंट लागून मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यातील डोंगरगांव येथील घटना अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी विरूर स्टेशन - उन्हाने आता कडक उष्णता होत आहे. प्रत्येकजण उष्...

  • राजुरा तालुक्यातील डोंगरगांव येथील घटना
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरूर स्टेशन -
उन्हाने आता कडक उष्णता होत आहे. प्रत्येकजण उष्णतेपासून मुक्त होण्यासाठी कूलर वापरत आहे. परंतु कूलरमध्ये पाणी भरताना निष्काळजीपणामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. याची प्रचिती आज राजुरा तालुक्यातील डोंगरगांव गावात झाली. विरूर स्टेशन येथून ४ किमी अंतरावर असलेल्या डोंगरगांव येथे आज दुपारी ४ वाजताच्या दरम्यान कुलर मध्ये पाणी टाकत असतांना राजवती उद्धव ताकसांडे वय ३२ करंटला करंट लागला. करंट लागताच गावातील लोकांनी राजवती ला वरुर येथील आशाधाम इस्पितळात नेले, त्यांनी लगेच राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राजवती हा घरी एकटाच राहायचा. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top