- कोण आहेत गोवरी, साखरी, रामपूर व ३३ गावातील लोकांची चाचणी करणारे डॉक्टरर्स
- वाचा सविस्तर..... डॉक्टरांच्या कार्यकर्तृत्वाला सॅल्युट कराल
कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांसाठी अपुरी जागा असून गरजेपेक्षा जास्त रुग्ण दाखल होत आहेत. तसेच डॉक्टरांची सकारात्मक मानसिकता समजून घ्यायला हवी. एका प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ वैदयकीय अधिकारी नेमल्या गेल्या आहे. तर काही ठिकाणी सध्या एक किंवा दोन असेच असेच कर्मचारी कामे करीत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली (बूज) येथे चार वैदयकीय अधिकारी नेमल्या गेले आहे. परंतु, त्यात एकाला कोरोना चा संसर्ग झाल्या मुळे त्याला घरीच कॉरोनटाइन करण्यात आहे व बाकी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना संबंधित दुय्यम प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमण्यात आले. त्यातही फक्त आता एक म्हणजेच डॉ. विपीन कुमार ओडेला हे कार्यरत आहे. यांच्या प्राथमिक आरोग्य केन्द्रा अंतर्गत ३३ गाव येत असल्यामुळे कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरी ही ते स्वतःचे कर्तव्य चिकाटी ने बजावत तालुक्यात अव्वल क्रमांकावरती त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे.
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गावो-गावी कोरोना संसर्ग तपासणी मोहीम सर्व महाराष्ट्र भर सुरू आहे. त्यात कढोली (बूज) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विपीन कुमार ओडेला हे जोमाने आपले कर्तव्य बजावत आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या संपुर्ण ३३ गावा मध्ये कोरोना संसर्ग तपासणी व त्यांच्या वरती योग्य तो उपचार पोहचविण्याकरिता ते सातत्याने कार्य करीत आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक मा. तहसीलदार साहेब यांनी देखील केले आहे. तरी काही गावकरी यांची अशी तक्रार होती की वैद्यकीय अधिकारी पूर्णता आरोग्य केंद्रात वेळ देत नाही परंतु या मागचे कारण काही वेगळेच आहे. त्यांना कोरोना लसीकरण तसेच गावो गावी जाऊन तपासणी करावयाचे असते तब्बल ३३ गावांची तपासणी करणे ते ही एका वैद्यकीय अधिकाऱ्याला ते एका क्षणात किंवा एका आठवड्यात होणे शक्य नाही आणि हे सर्व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार होत असतात म्हणून त्यांना पूर्णवेळ ते आरोग्य केंद्रात देता येत नाही. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी झटणाऱ्या अश्या डॉक्टरांना हि वेळ काही म्हणण्याची नाही तर सध्याची वस्तुस्थिती जाणून अश्या कोविड योध्यांच्या कार्यकर्तृत्वाला सॅल्युट करण्याचे आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.