Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ब्रेकिंग - भद्रावतीत लागली दोन दुकानाला आग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सात लाखाच्या वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी भद्रावती - भद्रावती शहरातील मुख्य बाजारपेठेत आज मंगळवार दि.13 ...

  • सात लाखाच्या वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
भद्रावती -
भद्रावती शहरातील मुख्य बाजारपेठेत आज मंगळवार दि.13 ला पहाटे 3 ते 4 वाजताच्या दरम्यान लागलेल्या आगीत दोन दुकाने भस्मसात होऊन जवळपास सात लाखाच्या वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

पहाटे 6 वाजता अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी पोहचली मात्र तोपर्यंत उपस्थित नागरिकांनी आग विझवली होती. या आगीत संजय वसंत बेलगावकर यांच्या वसंत आयुर्वेदिक मेडीकल स्टोअर्स ला आग लागून दुकानातील सर्व मालासह आवश्यक दस्तऐवज दुकान परवाना जळून खाक झाला. यात त्यांचे जवळपास तीन लाखाचे नुकसान झाले. तर बाजूलाच असलेल्या मंगेश संजय सहारे यांच्या सहारे पूजा साहित्ये भांडाराला आग लागून दुकानातील सर्व माल जळाला यात त्यांचे जवळपास अडीच लाखाचे नुकसान झाले. घटनेची तक्रार दोन्ही दुकान मालकांनी भद्रावती पोलीस स्टेशन ला दिली. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी करून पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास भद्रावती पोलीस करीत आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top