Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: उपजिल्हा रुग्णालय राजुरा क्षेत्रासाठी वरदान ठरणार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लोकप्रिय आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय राजुराचे लोकार्पण १२ कोटी ६४ लाख रुपये खर्चून प्रशस्त रुग्णालय जनसेवेसाठी सज्ज आमचा व...

  • लोकप्रिय आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय राजुराचे लोकार्पण
  • १२ कोटी ६४ लाख रुपये खर्चून प्रशस्त रुग्णालय जनसेवेसाठी सज्ज
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अथक परिश्रमाने पुर्णत्वास आलेल्या १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय राजुराचे लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आणि खासदार बाळु धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. 

उद्घाटनपर मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ९ डिसेंबर २०१० रोजी राजुरा येथील कार्यक्रमात श्रेणीवर्धीत १०० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयाची घोषणा केली होती. त्या घोषणेच फलीत आज राजुरा तालुक्यातील नागरीकांना प्रत्यक्ष पहावयास मिळत आहे. निश्चितपणे हे रुग्णालय क्षेत्रातील जनतेच्या सेवेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, नगराध्यक्ष अरुण धोटे, जिल्हा चिकिस्तक निवृत्ती राठोड, कार्यकारी अभियंता संतोष जाधव, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरीश गाडे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे, मुख्याधिकारी अर्शिया जुही, हमीदभाई, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रंजन लांडे, पंस सभापती मुमताज अब्दुल जावेद, पंस उपसभापती मंगेश गुरणुले,  सं.नि.यो. अध्यक्ष साईनाथ बतकमवार, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, नंदु वाढई, एजाज अहमद, ॲड सदानंद लांडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. लहू कुलमेथे आणि अभियंता ए.ए.बाजारे, शाखा अभियंता वैभव जोशी, नगरसेवक, काँग्रेसचे विविध शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, रुग्णालय अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निवृत्ती राठोड यांनी तर आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिक्षक डॉ. लहू कुलमेथे यांनी केले संचालन प्रयोग शाळा तंत्रज्ञ चंद्रकांत नेवलकर यांनी केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top