Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अपयश लपवण्यासाठी जुन्याच कामांचे लोकार्पण करून नव्याने श्रेय लाटण्याचा लोकप्रतिनिधीचा केविलवाणा प्रयत्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या रुग्...


आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या रुग्णालयासाठी अद्ययावत इमारत बाधकामास ०२ सप्टेंबर २०१४ ला मान्यता मिळाली. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू आणि निवडणूकांनंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले. तत्कालीन आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेऊन तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून जून २०१८ मध्ये १४.१७ कोटी रुपयांची इमारत कामाची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविली. जुलै - २०१५ च्या पुरवणी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली. वारंवार कामाच्या प्रगतीचा आढावा घेऊन तत्कालीन आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करू त्यांनी आपल्या कार्यकाळात सन २०१९ पर्यंत काम पूर्ण करून घेतले. परंतु रुग्णालयात आवश्यक अद्ययावत उपकरणे खरेदी आणि वाढीव पद निर्मिती साठी आरोग्य संचालनायलात विलंब झाल्याने त्यावेळी इमारतीचे लोकार्पण होऊ शकले नव्हते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णालय इमारत तेव्हाच आरोग्य विभागाला हस्तांतरित करण्यात आली होती.

परंतु तयार विकासकामांचे श्रेय लायटण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधी कडून होत आहे. आपली विकासकामाबद्दल असलेली अकार्यक्षमता व अर्थसंकल्पातील राजुरा विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी असलेल्या अल्प तरतुदी लपविण्यासाठी आज रुग्णालय इमारत लोकार्पण कार्यक्रम घेतला आहे. प्रशासनाकडून कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यक्रमावर निर्बंध लावले जात असतांना शासनाच्या नियमाला बाजूला सारून आज हा कार्यक्रम घेतला आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचा आरोप माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केला आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top