- होळीदहनासाठी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमू नये
- सॅनीटायझर हातावर लावल्याबरोबर होळीच्या पुजनाकरीता आगीजवळ जाऊ नये
तसेच दि. 28 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या होळी सणानिमित्य सार्वजनिक ठिकाणी होळीचे दहन करीत असतांना 5 पेक्षा अधिक व्यक्ती एकावेळी एकत्र येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच सदर ठिकाणी नागरीकांनी सामाजिक अंतर राखणे व मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे.
होळी दहन स्थळी सॅनीटायझर ठेवले असल्यास सॅनीटायझर हातावर लावल्याबरोबर होळीच्या पुजनाकरीता आगीजवळ न जाता काही काळ आगीपासुन लांब उभे राहावे. शक्यतोवर नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी होळीचे दहन करु नये. वृध्द व्यक्ती आणि लहान बालके यांनी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या होळी दहनाकरिता जाणे टाळावे, असे आवाहन देखीत जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी केले आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायदा, भारतीय दंड विधान व इतर संबंधीत कायद्यातील तरतुदीअन्वये कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.