Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वेकोलित कोविशिल्ड लसीकरणाचा शुभारंभ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सर्वांनी लसीचा लाभ घेण्याचे सीजीएम सब्यसाची डे यांचे आवाहन अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - राजुरा तालुक्यातील वेकोलिच्य...

  • सर्वांनी लसीचा लाभ घेण्याचे सीजीएम सब्यसाची डे यांचे आवाहन

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रीय दवाखान्यात कोविशिल्ड लसीकरणाचा शुभारंभ आज दिनांक 15 मार्चला करण्यात आला. क्षेत्रीय मुख्य महाव्यवस्थापक सब्यसाची डे यांनी या लसीकरण केंद्राचे उदघाटन केले.

यावेळी झालेल्या लसीकरण शुभारंभ कार्यक्रमाचे उदघाटन क्षेत्रीय महाव्यवस्थापक सब्यसाची डे यांनी ही लस सुरक्षित तसेच मोफत दिली जात असून वेकोलिच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तसेच कुटुंबियांनी ऑनलाईन नोंदणी करून लस घेण्याचे आवाहन केले. क्षेत्रीय वैद्यकिय अधिकारी डॉ. ओवेस अली यांनी कोविद 19 च्या लसीकरणा विषयी सविस्तर माहिती दिली. पहिल्याच दिवशी जवळपास ३० कर्मचाऱ्यांनी लास घेतली. 

या शुभारंभ कार्यक्रमाला महाव्यवस्थापक (संचालक) सी.पी.सिंह, क्षेत्रीय कार्मिक व्यवस्थापक समीर बारला, डॉ. चंद्रशेखर, डॉ. जगदीश, कढोली प्राथमिक स्वास्थ केंद्राचे डॉ. विपीन कुमार ओदेला, बोडारघु राम आणि त्यांची संपूर्ण टीम, क्षेत्रीय कल्याण समिती सदस्य विवेक अल्लेवार, शिरपूरम रामलू, पी.बी. पाटील, रामचंद्र, मीडिया प्रभारी सूरज इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मेट्रन शशी मसीह यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने वैद्यकीय कर्मचारी व कामगार उपस्थित होते. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top