Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पाणीपुरी व नूडल्स खाल्ल्याने मुलीचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
३० ते ४० लोकांना विषबाधा आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी नागपूर - भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील भेंडाळा गावात विषबाधेमुळे १२ वर्षीय मुली...

  • ३० ते ४० लोकांना विषबाधा
आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील भेंडाळा गावात विषबाधेमुळे १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर गावातील ३० ते ४० लोकांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्ञानेश्वरी रामदास सतीबावणे असे त्या मृत मुलीचे नाव असून रविवारी बाजारामध्ये नूडल्स खाल्याने तिला उलट्या आणि हगवण सुरू झाली होती. त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे ज्ञानेश्वरीच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. विषबाधा झालेल्या लोकांना उपचारासाठी पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

चायनीज आणि पाणीपुरी खाल्ली
भेंडाळा या गावात रविवारी आठवडी बाजार होता. आठवडी बाजारमध्ये गुपचूप आणि चायनीजचे ठेले लागले होते. पाणीपुरी आणि नूडल्स खाल्लेल्या सर्व लोकांना सोमवारी त्याचा त्रास जाणवू लागला. रामदास सती बावने यांच्या कुटुंबातील मुलांनी सुद्धा हे नूडल्स खाल्ले होते. त्यानंतर सोमवारपासून या मुलांना उलट्या आणि संडासचा त्रास सुरू झाला. त्यामुळे या मुलांनी सोमवारपासून काहीही खाल्ले नव्हते. त्यातच मंगळवारी ज्ञानेश्वरीची प्रकृती अधिक बिघडल्याने तिच्या वडिलांनी तिला उपचारासाठी पवनी येथे नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर विषबाधा झाल्याचे समोर आले.

ज्ञानेश्वरीच्या मृत्यूची बातमी गावात पसरल्या नंतर हळूहळू गावातील बऱ्याच लोकांना सध्या उलटी आणि हागणीचा त्रास सुरू झाला. अशा लोकांवर घरी किंवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, नेमक्या किती लोकांना याचा त्रास होतो आहे हे सध्यातरी स्पष्ट झालेले नाही.

आरोग्य यंत्रणा सतर्क
ज्ञानेश्वरीच्या मृत्यूची बातमी आरोग्य यंत्रणेला मिळताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी होत गावात पोहोचली आहे. प्रत्येक घरातील व्यक्तींची तपासणी करून माहिती गोळा करीत आहेत. तसेच उपचाराची गरज असणाऱ्या सर्वांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात आहे. विषबाधा नेमकी कशाने झाली याचा शोध आरोग्य यंत्रणा घेत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top