Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: चिचबोडी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जागीच ठार ; एक जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वरुर रोड ते विरूर स्टेशन रस्ता चौपदरीकरण करण्याची मागणी अविनाश रामटेके / तिरुपती नल्लाला - आमचा विदर्भ प्रतिनिधी विरूर स्टेशन (राजुरा) - राज...

  • वरुर रोड ते विरूर स्टेशन रस्ता चौपदरीकरण करण्याची मागणी

अविनाश रामटेके / तिरुपती नल्लाला - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरूर स्टेशन (राजुरा) -
राजुरा तालुक्यातील चिचबोडी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार व दुसरा जखमी झाल्याची घटना आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास घडली. या अपघात 35 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एक जखमी झाला. कौशिक दिवाकर इस्टाम वय 35 रा. भिमनी, ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर असे मयताचे नांव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार कौशिक इस्टाम बेरडी येथे नवरदेवा कडून लग्नाला आला होता. येथून तो टेम्बुरवाही येथे आपल्या ओळखीच्या लोकांना भेटण्यासाठी आला होता. भेट घेऊन टेम्बुरवाही येथून मित्रा सोबत मोटरसायकल क्रमांक MH 34 Y 9363 ने परत बेरडी ला जात असतांना चिचबोडी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार कौशिक जागीच ठार झाला. त्याचा मित्र जखमी झाला. लोकांनी 108 एम्बुलन्स बोलावून जखमीला दवाखान्यात पाठविले मात्र जखमीचे नांव कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णकुमार तिवारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे. 

लोकांनी आमचा विदर्भ प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले कि वरुर रोड ते विरूर स्टेशन रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावर आता वाहतूक वाढली आहे. याच मार्गा वर आता दोन जिनिंग, राईस मिल, विरूर स्टेशन येथून तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरु असून हा मार्ग समोर जाऊन महाराष्ट्र - तेलंगणालाही जोडतो. मात्र हा रस्ता अरुंद असल्याने मागील काही वर्षात या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. शासनाने त्वरित हा रास्ता चौपदरीकरण करावा अशी मागणी लोकांनी केली आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top