Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सहा जिल्ह्यातून तडीपार असलेल्या बच्ची यादव ला साथीदारासह पोलिसांनी देशीकट्यासह केली अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोन जिवंत काडतुसे हि मिळाली रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपुर - गुरुवार दि. 18 मार्चच्या रात्री पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की ...

  • दोन जिवंत काडतुसे हि मिळाली
रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपुर -
गुरुवार दि. 18 मार्चच्या रात्री पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की शहरातून हद्दपार केलेला तडीपार येदुराज उर्फ रामनरेश आरक (बच्ची यादव) रा. सुभाष वॉर्ड, बल्लारपूर हा आरोपी कमरेला देशी कट्टा (पिस्तूल) खोसून फिरत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार उमेश पाटील आपले सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन वस्ती विभाग सर्च करून मोठया शिफातीने रात्री एक वाजताच्या दरम्यान बच्ची उर्फ येदुराज वय 29 व साथीदार फारुख ऐय्याश शेख रा. बालाजी वॉर्ड दोघांना मोटारसायकल वर फिरत असतांना ताब्यात घेतले व झडती घेतली असता त्यांचा कडून कमरेला खोसलेली देशी कट्टा पिस्तूल व साथीदार फारुख याचा खिशात दोन जिवंत काडतुसे मिळाली दोघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. दोघांवरही कलम 425 भारतीय हत्यार कायदा व 142 महाराष्ट्र पोलीस कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी वेळेवरच सतर्कता दाखवून मोठा अनर्थ टाळला. ही कारवाई ठाणेदार उमेश पाटील, API गायकवाड, API मुलाणी, PSI टेंभुर्णें, PSI चांदोरे, नापोशी सतीश पाटील, शरद कुडे, सीमा कोरते, विशिष्ट रंगारी यांनी केली. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top