Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद द्वारे उत्कृष्ट संसदपट्टू ॲड. वामनराव चटप यांचे अभिनंदन !
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना - राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा समजला जाणारा इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी, नवी द...

शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा समजला जाणारा इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी, नवी दिल्ली द्वारे दिला जाणारा "भारत ज्योती अवॉर्ड" मा.ॲड. वामनराव चटप साहेब यांना जाहीर झाला असून दिनांक ०९ एप्रिल २०२१ रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद राजुरा च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन मराठा सेवा संघ शाखा राजुराच्यावतीने देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

चटप साहेबांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे पंधरा वर्षे प्रतिनिधित्व करताना कुठलीही सुरक्षा घेतली नाही. ते गेल्या चाळीस वर्षांपासून राजकिय व सामाजिक क्षेत्रात तसेच शेती व वकिली क्षेत्रात, आदिवासी बहुल भागातील गरजेचे प्रामुख्याने प्रश्न सोडविले, त्यांचा अनेक विषयात दांडगा अभ्यास असून ते दोनदा संसदपट्टू सुद्धा राहिले आहे. त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली .

यापुर्वी महाराष्ट्रातून हा पुरस्कार क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि शिक्षणमहर्षी व बिहारचे राज्यपाल डी.वाय. पाटील या दोघांनाच मिळाला आहे. हा सन्मान मिळविणारे चटप साहेब महाराष्ट्रातून तिसरे व विदर्भातून पहिले व्यक्ती आहेत हे विशेष! तसेच जस्टिस फातिमा बिवी, जस्टिस पि. एन. भगवती, उस्ताद अमजद अली खान, अभिनव बिंद्रा, धनराज पिल्ले अशा अनेक नामवंत लोकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद राजुरा चे तालुका अध्यक्ष विनोद गेडाम, विदर्भ युवा सचिव महिपाल मडावी, सचिव दिपक मडावी, नितीन सिडाम, जिल्हा युवा संघटक विश्वेश्वर मडावी, युवा तालुका उपाध्यक्ष संतोष मडावी, जिल्हा युवा सचिव शुभम आत्राम उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top