- ५१ लाखांचा मुद्देमालासह आरोपीस अटक
- बल्लारपूर पोलिसांची कारवाई
चंद्रपूर-कळमना मार्गावर रात्रीच्या अंधाराचा लाभ घेत, दारूची वाहतूक होत असल्याची माहिती खबऱ्याच्या माध्यमातून रात्रौ पाळीवर गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे बामणी टी पॉईंट'जवळ नाकेबंदी करून एम.एच-३४ बि.जी-५१३१ या ट्रक' ची तपासणी केली असता पोलिसांना चकमा देण्यासाठी ट्रकमध्ये दारू वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र गुप्त असा कप्पा तयार करून त्यामध्ये ९० एम.एल देशी दारू'च्या २१० खरड्याचे बॉक्स २१ हजार नग साधारणता किंमत २१ लक्ष, ऑफिसर चॉईस ९० एम.एल चे २५ खरड्याचे बॉक्स २५०० नग साधारणता किंमत ५ लक्ष, स्टर्लिंग रिसर्वं व्हिस्की (बी-७) १८० एम.एल ४खरड्याचे बॉक्स १९२ नग साधारणता किंमत २६ लक्ष ५७ हजार ६०० रुपये किमतीचा दारूसाठा आणि २५ लक्ष १० हजार किमतीचे वाहन असा ५१ लक्ष ६७ हजार ६०० रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेत. या तस्करी प्रकरणी वाहनचालक धर्मेंद्र प्रकाश खोब्रागडे वय-१९ रा. रमाई नगर अष्टभुजा वार्ड या व्यक्तीला अटक करण्यात आली आहेत.
"एकंदरीत पोलिसांनी केलेल्या या कार्याची स्तुती शहरात मोठ्या प्रमाणात होत आहेत. तर दुसरीकडे जिल्हा सीमा ओलांडून इतक्या मोठ्या प्रमाणात दारूसाठा नेमका कुणाच्या गोडाऊनमध्ये खाली होणार होता? या परिसरात छुपे गोडाऊन कुणाचे? जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याच्या राजाश्रयातून सीमारेषा ओलांडून शहरात दारू नेहमी येत आहेत. अशी चर्चा सध्या शहरात जोमाने सुरू आहेत"
सदर कारवाई पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जोशी, हवालदार जीवतोडे, आनंद परचाके, आनंदराव दिघे, सतीश पाटील, शरद कुळे, रतन पेंदाम, गणेश पुरडकर, प्रसन्नजीत डोरलीकर, कुणाल पुसाम यांच्या वतीने करण्यात आली आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे हे करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.