Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वसतिगृह स्थलांतर करण्यापूर्वी मुला-मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाय योजना करण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विश्वेश्वर मडावी - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - गडचांदूर येथे नव्याने शासकीय आदिवासी वसतिगृह इमारतीत स्थलांतर करण्यापूर्वी मुला-मुलींच्य...

विश्वेश्वर मडावी - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर येथे नव्याने शासकीय आदिवासी वसतिगृह इमारतीत स्थलांतर करण्यापूर्वी मुला-मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाय योजना करूनच सदर वसतिगृह स्थलांतर करण्यात यावे. यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद न्यू दिल्ली, शाखा राजुरा चे वतीने आमदार सुभाष धोटे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची आमदार सुभाष धोटे यांनी वेळीच दखल घेऊन आदिवासी मंत्री नामदार के.सी. पाडवी यांना व प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग यांचेसी चर्चा करून सुरक्षेच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्याची मागणी केली. योग्य ती उपाययोजना करण्यात येईल असे आश्र्वासन देण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष अंकुश कुळमेथे, जिल्हा संघटक विश्वेश्वर मडावी, विदर्भ सचिव महिपाल मडावी, तालुका अध्यक्ष विनोद गेडाम, उपाध्यक्ष नितीन सिडाम, तालुका उपाध्यक्ष अमृतराव आत्राम, युवा सचिव दिपक मडावी तसेच इतर पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top