कोरपना -
अंबुजा सिंमेट फाउंडेशन उपरवाही यांच्या सयुंक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिरापूर येथे शेतकरी मार्गदर्शन प्रशिक्षण व महिला सबलीकरण कार्यक्रमाअंतर्गत गावातील सर्व महिला, बचत गटातील महिला सदस्या तथा गावकरी यांच्या उपस्थितीत गावचे नवनिर्वाचित उपसरपंच तथा माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे शा.व्य.समितीचे अध्यक्ष मारोती दादाजी बत्की, स्वराज किसान गृपचे सचिव दत्ताभाऊ डाहुले, ग्रामपंचायत सदस्या सौ. पावडेताई, सौ. सिडामताई, सौ. शेंडेताई, वाघमारे सर, अलोने सर, गोखरे सर, धवने सर, आयोजक पेंदोर सर व त्यांचे सहकारी मंडळी यांच्या सहकार्याने कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
यावेळी खेळाच्या माध्यमातून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावातील महिलांनी हिरहिरीने रांगोळी स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा, शेतीविषयक प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेतला. प्राविण्य मिळविणाऱ्या महिला गटाना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता गावातील ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, महिला मंडळ तथा गावकरी मंडळींनी अथक परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.