चंदनखेडा येथील नेहरु विद्यालय ही एकेकाळी थुटे आडनावाच्या मुख्याध्यापकाच्या शिस्तीमुळे नावारुपास आलेली शाळा आहे. या शाळेतून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी मोठ-मोठ्या हुद्द्यावर पोहोचले. त्यामुळे या शाळेचे आपल्याला काही देणे लागते. या कृतज्ञतेच्या भावनेतून काही माजी विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी आता शिक्षण घेत आहेत, त्यापैकी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले पाहिजे असा विचार केला. त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना हा विषय समजावून सांगितला. शाळेकडून परवानगी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन, पेन्सिल, फळे, मिठाई वाटून आपल्या जुन्या आठवनींना उजाळा दिला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पुनवटकर, मडावी बाबू, मधुकर चौधरी, नरेंद्र आस्कर, प्रवीण निवडिंग, अविनाश लोणकर, संजय ब्राम्हणकर, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल हनवते, चंद्रशेखर निमजे, मंगेश नन्नावरे, प्रशांत श्रीरामे, गणेश हनवते, प्रशांत नन्नावरे, आशिष हनवते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.