Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ऑनलाईन मोबाईल खरेदीत कंपनीने फसवणूक केल्याबद्दल युवकाने केली आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चिमूर - भिसी अप्पर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या पूयारदंड येथील रोहित राजेंद्र जांभुळे वय१८ वर्षे या युवकाने काही ...

मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चिमूर -
भिसी अप्पर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या पूयारदंड येथील रोहित राजेंद्र जांभुळे वय१८ वर्षे या युवकाने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन मोबाईल बुकींग केला होता.  त्याची मूळ किंमत १५ हजार रुपये होती व त्यासाठी त्याने १० हजार रुपये त्या कंपनीला ऑनलाईनच्या माध्यमातून दिले होते व उर्वरित ५ हजार रुपये मोबाईल पार्सल आल्यानंतर पोस्ट मार्फत पार्सल स्वीकारून पोस्ट विभागाला देऊन पार्सल घ्यायचे होते. यासाठी युवकाला पोस्टातून फोन आला. युवकाने पार्सल सोडविण्यासाठी पैसे नसल्याने आईकडे पैशाची मागणी केली. आईने पैशाची जुडवा जुडव करून मुलासोबत पोस्टामध्ये पार्सल सोडवायला गेले. सर्व प्रक्रिया पूर्ण करून कंपनीने पाठविलेले पार्सल आईने व मुलाने खोलून पाहिले तर त्या पार्सल मध्ये मोबाईल ऐवजी २ पॉकेट, १ बेल्ट व खाली खरडा अशा बिनकामी वस्तू होत्या.
युवकाला आपली मोबाइल कंपनीकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कंपनीच्या संपर्क क्रमांकावर फोन केला परंतु त्या कंपनीला फोनच लागत नव्हता. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने १५ हजार रुपयांचा भुर्दंड बसल्याने घरचे आई-वडील नाराज झाले होते.  त्यामुळे युवकाने या गोष्टीचा मनावर परिणाम करून घेतला. मुलगा काल दुपारी ३ वाजेपासून घरातून गायब होता. आई वडिलांनी नातेवाईक, मित्रपरिवारा कडे विचारपूस केली असता. त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. आज ९ ऑक्टॉबर रोजी सकाळी १०-११ च्या दरम्यान गावातील शेतकरी व महिला शेतात जात असतांना त्या मुलाची गाडी व कपडे विहीरी जवळ दिसल्यामुळे विहिरीत त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह सापडला. रोहीत ने कमरेला दगडाने भरलेली पोतळी बांधून विहीरीत उडी घेऊन आपला जीव संपविला या घटनेने सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्या मोबाईल कंपनीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी गावकरी व कुटुंबातील व्यक्तींकडून केली जात आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top