Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खलनायकांची आता खैर नाही....
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना तालुक्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायकांची एंट्री उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांची बदली उपविभागीय पोलीस अधिकारी...

  • कोरपना तालुक्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायकांची एंट्री
  • उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांची बदली
  • उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक हे जबाबदारी सांभाळणार आहे
शैलेश कोरांगे - प्रतिनिधी
कोरपना -

कोरपना तालुक्यात अवैध धंदे जोमाने वाढत आहे. अवैध धंदे चालक पोलिसांच्या युक्त्यावर भारी पडतांना दिसत होते. सध्या पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून विलास यामावार यांची कारकीर्द जेमतेम ठीकच होती. यामावार यांनीही अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. आता यामावार यांची बदली रत्नागिरी येथे झाल्याने ही जबाबदारी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक हे सांभाळणार आहेत. विशेष म्हणजे पोलीस दलाच्या कारकिर्दीची सुरुवात नायक यांनी कोरपना तालुक्यातूनच केली होती. वणी येथील नायक यांची कारकीर्द उत्तम आणि अवैध धंदे चालकांना घाबरविणारी होती हे ऐकल्यावर खलनायक सध्या घाबरून गेले आहे. तशीच कारकीर्द कोरपना तालुक्यात राहिल्यास खलनायकांची आता खैर नाही अशी चर्चा जनमानसांत सुरु आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top