Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर येथील धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा कार्यक्रम रद्द
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बौद्ध बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन श्रावण कुमार - प्रतिनिधी चंद्रपूर - 16 ऑक्टोबर 1956 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...

  • बौद्ध बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -

16 ऑक्टोबर 1956 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूर येथील दिक्षाभूमी येथे लाखो बांधवांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली होती. त्याचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूरच्या वतीने चंद्रपूर येथील ऐतिहासिक पवित्र दिक्षाभूमीवर दरवर्षी 15 व 16 ऑक्टोबरला लाखो बौद्ध बांधव यांच्या उपस्थितीत धम्मचक्र अनुप्रवर्तन  समारंभाचे भव्य आयोजन करण्यात येते. परंतु, या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता समस्त जनतेचे हित, केंद्र व राज्य शासनाच्या नियमानुसार संस्थेने धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाचा कार्यक्रम रद्द केलेला आहे. त्यामुळे बौद्ध बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

सदर कार्यक्रम रद्द केल्यामुळे दिक्षाभूमी येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये कोणतेही दुकान, बुक स्टॉल साठी परवानगी  देण्यात आलेली नाही. समस्त बौद्ध बांधवांना  धम्मचक्र अनुप्रवर्तन  दिनानिमित्त घरूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  करून धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन घरीच साजरा करावा. 15 व 16 ऑक्टोंबर रोजी कोणीही दीक्षाभूमी चंद्रपूर परिसरात गर्दी करू नये, असेही आवाहन जिल्हा प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top